close

Large Call to Action Headline

उत्तम उत्पादनासाठी निवडा योग्य आणि दर्जेदार बियाणे!

आम्ही शेतकऱ्यांसाठी प्रमाणित बियाणे आणि आधुनिक शेती उपाय उपलब्ध करून देतो. तुमच्या पिकासाठी योग्य मार्गदर्शन आणि हमखास दर्जा – एकाच ठिकाणी.

img

प्रमाणित आणि उच्च दर्जाचे बियाणे

जास्त उगवणक्षमता आणि चांगले उत्पादन देणारी निवडक बियाणे.

img

आधुनिक शेती मार्गदर्शन

नवीन तंत्रज्ञानावर आधारित सल्ला आणि उपाय.

img

शेतकऱ्यांचा विश्वास

अनेक समाधानी ग्राहक आणि वर्षानुवर्षांचा अनुभव.

img

आदरणीय शेतकरी राजा, सादर प्रणाम जगाचा पोशिंदा ही उपाधी तुम्हाला उगीच मिळाली नाही. उन्हातान्हात, पावसात, दवात राबणाऱ्या तुमच्या दोन हातावरच हा देश उभा आहे. आम्ही गजानन सीड्स, परिवार तुमच्या या अफाट कष्टाला सलाम करतो. आम्ही तुम्हाला फक्त बियाणे विकायला आलो नाही, आम्ही आलो आहोत तुमचा एक मित्र, मार्गदर्शक आणि प्रगतीचा भागीदार बनायला बनायला. बंधुनो, आज शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. हवामान बदल, कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, खर्च वाढ, मजुरी, खत औषधांचे भाव गगणाला भिडले, बाजाराची अस्थिरता, कधी भाव मिळतो, कधी मिळत नाही. सर्वात मोठी समस्या म्हणजे चुकीचे बियाणे स्वस्त बियाण्याच्या नादात आपण फसतो परिणाम काय नैराश्य. एक पिशवी बियाणे म्हणजे फक्त ५००-१००० रुपयांचा खर्च नाही. त्यात तुमच्या ४ महिन्याची मेहनत, कुटुंबाचे स्वप्न आणि वर्षभराचा खर्च दडलेला असतो, म्हणूनच बियाणे निवडताना तडजोड नको. आम्ही गेली 35 वर्षे शेतकऱ्यांची सेवा करीत आहोत. आमचे ध्येय एकच “प्रत्येक एकरातुन जास्त उत्पादन” “प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात समृद्धी”, आम्ही व्यापारी नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पोरापैकी एक आहोत. बियाणे विकून आमचे काम संपत नाही. तिथुनच आमची खरी सेवा सुरु होते. चांगले बियाणे निवडा, चांगले पीक घ्या, कुटुंबाला सुखी करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. पेरणीपासून कापणीपर्यंत एकदा सेवा घेऊन बघा. आमचा विश्वास आणि तुमची मेहनत सोनं पिकावल्याशिवाय राहणार नाही. “जय जवान” “जय किसान” ✔️ विश्वासार्ह दर्जा ✔️ प्रमाणित उत्पादने ✔️ योग्य दर ✔️ तज्ञ सल्ला आमचे ध्येय आहे — “प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात समृद्धी आणणे.”

आमच्या सेवा

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि भरघोस उत्पादनासाठी आम्ही तज्ञ मार्गदर्शन व दर्जेदार बियाणे प्रदान करतो. योग्य सल्ला, योग्य उत्पादने आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमची शेती अधिक यशस्वी करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत

img

पीकानुसार योग्य बियाण्यांची निवड

प्रत्येक पिकासाठी योग्य व प्रमाणित बियाण्यांची निवड अत्यंत महत्त्वाची असते. आम्ही हवामान, जमिनीचा प्रकार आणि हंगाम लक्षात घेऊन योग्य बियाण्यांचा सल्ला देतो. उच्च दर्जाच्या बियाण्यांमुळे उगवण चांगली होते आणि उत्पादन वाढते.

img

शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान सल्ला

आजच्या आधुनिक शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे. ठिबक सिंचन, स्प्रे पंप, सुधारित पद्धती याबाबत आम्ही मार्गदर्शन करतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे वेळ, पाणी आणि खर्च वाचतो. नियोजनबद्ध शेतीमुळे उत्पन्नात स्थिरता येते.

आमची उत्पादने

शेतकऱ्यांच्या प्रत्येक गरजेनुसार दर्जेदार व विश्वासार्ह शेती उत्पादने उपलब्ध आहेत. उत्तम उत्पादन आणि भरघोस उत्पन्नासाठी आम्ही गुणवत्तेला प्राधान्य देतो.

img

वाण :- गावरान दादू

हंगाम :- रब्बी, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, कर्नाटक व गुजरात. वाणाचे गुणधर्म: ◆ कांद्याचा रंग फिकट गुलाबी चमकदार ◆ मध्यम ते मोठ्या आकाराचे कांदे ◆ डबल पत्ती कांदे ◆ चवदार व तिखट अधिक वजनदार ◆ रोगास सहनशील ◆ 180 ते 200 दिवस साठवण क्षमता (वातावरणानुसार) ◆ कालावधी पुर्नलागवडीपासून 110 ते 115 दिवस ◆ हेक्टरी उत्पादन 500 ते 550 क्विंटल / हेक्टरी (वातावरणानुसार)

img

वाण :- रत्नाकर फुरसुंगी

हंगाम :- रब्बी, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, राजस्थान व गुजरात. वाणाचे गुणधर्म: ◆ कांद्याचा रंग आकर्षक चमकदार गुलाबी ◆ एकसारखे मध्यम ते मोठ्या आकाराचे ◆ गोलाकार कांदे ◆ तीन पत्ती कांदे ◆ रोगास सहनशील ◆ 180 ते 200 दिवस साठवण क्षमता (वातावरणानुसार) ◆ कालावधी पुर्नलागवडीपासुन 110 ते 115 दिवस ◆ हेक्टरी उत्पादन 500 ते 550 क्विंटल (वातावरणानुसार)

img

वाण :- प्रणव गुलाबी

हंगाम :- रब्बी, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान व गुजरात. वाणाचे गुणधर्म:- ◆ कांद्याचा आकर्षक चमकदार गुलाबी लाल रंग ◆ एकसारखे मध्यम ते मोठ्या आकाराचे कांदे ◆ तीन पत्ती कांदे ◆ रोगास सहनशील ◆ 180 ते 200 दिवस साठवण क्षमता ◆ कालावधी 110 ते 115 दिवस पुर्नलागवडीपासुन ◆ हेक्टरी उत्पादन 550 ते 600 क्विंटल (वातावरणानुसार)

img

वाण :- लालचंद

हंगाम :- खरीप, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात व राजस्थान. वाणाचे गुणधर्म:- ◆ आकर्षक गर्द लाल चमकदार रंग ◆ एकसारखे गोलाकार कांदे ◆ रोगास सहनशील ◆ साठवण क्षमता ५० ते ६० दिवस ◆ कालावधी पुर्नलागवडीपासून ८० ते ९० दिवस ◆ हेक्टरी उत्पादन २५० ते ३०० क्विंटल (वातावरणानुसार)

आम्हालाच का निवडाल?

विश्वास, गुणवत्ता आणि अनुभव यांची खात्री देणारे आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून योग्य मार्गदर्शन आणि उत्तम उत्पादने देणे हेच आमचे ध्येय आहे.

✔️ प्रमाणित आणि दर्जेदार उत्पादने ✔️ योग्य दरात उत्तम गुणवत्ता ✔️ अनुभवी मार्गदर्शन ✔️ शेतकऱ्यांशी प्रामाणिक व्यवहार ✔️ वेळेवर उपलब्धता आणि जलद सेवा

img
img

आमच्या शेतांची झलक

आमच्या विविध कांदा वाणांची लागवड ज्या शेतांमध्ये केली जाते, त्या शेतांची आणि पिकांची ही खास झलक. आधुनिक शेती पद्धती, निरोगी कांदा रोपे आणि उत्कृष्ट दर्जाच्या कांदा वाणांच्या लागवडीमागील मेहनत या छायाचित्रांमधून पाहा. प्रत्येक शेताची कहाणी ही गुणवत्तापूर्ण उत्पादनाच्या आमच्या बांधिलकीची ओळख आहे.

img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img
img

आजच संपर्क साधा

उत्तम बियाणे आणि भरघोस उत्पादनासाठी आजच आम्हाला भेट द्या किंवा आंम्हाला संपर्क करा.

img

आजच भेट द्या

img

पत्ता: गजानन ट्रेडर्स प्रा. लिमिटेड, हाऊस नं. 1608, सौंदाणे ता. मालेगाव जि. नाशिक (महाराष्ट्र) – 423208

संपर्क करा

img

+91 97677 79521 / 97697 79521

img

gajananseedsgt@gmail.com

कार्यालयीन वेळ

सोमवार ते शनिवार – सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत

टीप : दर रविवारी सुट्टी राहील.

कॉपीराइट © 2026-27 गजानन ट्रेडर्स प्रा. लिमिटेड . सर्व हक्क सुरक्षित.